खर्डा प्रतिनधी -७ जानेवारी
जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी शाळेच्या बालवैज्ञानिकांनी ३५ माॅडेल्स स्वतः तयार करुन शाळास्तर विज्ञान प्रदर्शनात त्याचे सादरीकरणही केले.आज तेलंगशी केंद्र शाळेत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय,तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते,मुख्याध्यापक केशव गायकवाड,आनंता गायकवाड,संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले ,विजयकुमार रेणुके,लक्ष्मी जायभाय,अशोक जाधव,प्रसाद भिसे ,नितीन पवार ,पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या वैज्ञानिक व गणिती तंञज्ञानाचे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते यांनी भरभरुन कौतुक करुन प्रेरणा दिली. प्राथमिक शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शन हा दुर्मीळ उपक्रम आहे.शहरापासून दूर असणारे दुर्गम भागातील विद्यार्थीही आता सृजनशीलतेत प्राविण्य मिळवून संशोधक बनत आहेत विद्यार्थ्यांनी ही संशोधक वृत्ती कायम ठेवून शास्ञज्ञ होण्याचा सल्लाही त्यांनी बालवैज्ञानिकांना दिला.शाळेतील विज्ञान शिक्षक सुशेन चेंटमपल्ले यांच्या प्रयोगशील मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी हे माॅडेल्स तयार केले आहेत.
या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी माहीती संप्रेषण तंञज्ञानातील प्रगती,पर्यावरणास अनुकूल सामग्री,आरोग्य आणि स्वच्छता,वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणीय चिंता,आमच्यासाठी गणित यांसह अनेक विषयावर उत्कृष्ट असे स्वनिर्मित माॅडेल्स तयार केले आहेत.शाळापातळीवरील उत्कृष्ट माॅडेल्सचे जवळा येथे होणार्या तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण होणार आहे.
विद्यार्थी व शिक्षक यांच्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपक्रमाचे गटविकासअधिकारी प्रकाश पोळ,गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,विस्तारअधिकारी सुरेश कुंभार यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक यांनी कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment