जामखेड प्रतिनिधी : १४ जानेवारी
राजमाता जिजाऊ यांचे केवळ नाव घेऊन पुढची पिढी घडणार नाही तर समाजात संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी देशाला
असंख्य 'आऊसाहेबांची गरज आहे. त्यामुळे आपण जर आपल्या संकल्पाशी एकनिष्ठ राहिलो तरच भविष्यातील राजमाता जिजाऊ समाजामध्ये निर्माण होतील, असे प्रतिपादन सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
जामखेड येथे दि. १२ जानेऊवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावरील जगातील सर्वात मोठे १५ हजार स्क्वेअर फूटांमध्ये जगातील सर्वात मोठे भव्य राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे रेखाचित्राचे अनावरण सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले व नागरिकांना पहाण्यासाठी खुले झाले. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजश्री मोरे, महिला बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, अंजली ढेपे, हारीभाऊ बेलेकर, राजश्री पवार, सुरेश भोसले, प्राचार्य मडके, कन्या विद्यालयाच्या प्राचार्या डी.के. चौधरी, प्रकाश सदाफुले, बापु ढवळे, वैजीनाथ पोले, हरिभाऊ आजबे, राजेंद्र गोरे, अशोक यादव, नरेंद्र जाधव, बापुसाहेब शिंदे, दादा उगले, मोहन पवार, अमित जाधव, बापूसाहेब कारले, शरद शिंदे, यांच्या सह नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यावेळी राष्ट्रवादी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, आपल्याला देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर आपण इतिहास विसरता कामा नये. त्याची आठवण कायम आपल्या मनात जागृत राहिली पाहिजे. आधुनिक युगाचा ध्यास व इतिहासाची कास धरून आ. रोहित पवार हे काम करत आहेत आणि हे करत असताना कर्जत जामखेडच्या नागरीकांनी त्यांना साथ व आशिर्वाद मिळत आहेत. तसेच पुढील काळातही असेच सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. समाजाला संस्कारक्षम पिढीची मोठी गरज आहे व त्यासाठी असंख्य आऊसाहेबांची गरज आज देशाला आहे. असेही मत यावेळी सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुनंदाताई पवार व मान्यवरांचे स्वागत विविध कला सादर करून केले. शिवशंभु पथकाने दांडपट्टा लाठी काठी तलवारबाजीचे प्रत्याक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली तसेच कन्या विद्यालयाचे कला शिक्षक संतोष सरसमकर व विद्यार्थीनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील नाटीका सादर केली.
No comments:
Post a Comment