जामखेड प्रतिनिधी : १४ जानेवारी
जामखेड शहरालगत असलेल्या मोहा गावचे शिवारात नव्याने व विनापरवाना सुरू होत असलेल्या लक्ष्मी नावाच्या कलाकेंद्रावर छापा टाकून कारवाई करत सदर कलाकेंद्राचा व्यवस्थापक
सुरज बबन मुसळे, (वय-३२ वर्षे) , रा. कान्होपात्रानगर, जामखेड याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ (क) (१) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी पोलीस हेडकॉन्टेबल संजय भाऊसाहेब लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
काल दि. १३ जानेवारी रोजी रात्री २० .४५ वाजताचे सुमारास मी व पोलीस काॅन्स्टेबल सचिन पिरगळ असे आम्ही पोलीस स्टेशनची सरकारी जीप क्र. एमएच १६ - ८९६ हीने जामखेड-बीड रोडवरील मोहा गावच्या शिवारात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मोहा शिवारात लक्ष्मी नावाच्या कलाकेंद्रात विनापरवाना नृत्याचे कार्यक्रम चालु आहेत. याबाबत माहिती घेतली असता सदरचे कलाकेंद्र नव्याने सुरू झालेले आहे. अशी खात्री झाली असता. त्याठिकाण पोहचून दोन पंचांना बोलावून घेतले. व यानंतर लक्ष्मी नावाचे कलाकेंद्रात २१/१० वा.चे सुमारास आत जावुन पाहिले असता सदर ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या लहान- मोठ्या हॉलमध्ये एकुण १२ नृत्यांगणा व त्यांचे समोर बसलेले ग्राहक इसम यांचे समोर नृत्य करीत असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी समक्ष हजर असलेला कलाकेंद्राचा व्यवस्थापक यांचे कडेस त्यांचे नाव-गाव व परवाना या बाबत विचारपुस करता त्याने त्याचे नाव सुरज बबन मुसळे, (वय-३२ वर्षे) रा. कान्होपात्रा नगर, जामखेड असे सांगितले. त्याच प्रमाणे सदर कलाकेंदात नृत्याचा कार्यक्रम चालविणेकरीता आवश्यक असलेला परवाना नसल्याचे देखील पंचासमक्ष कळविले. त्या ठिकाणी केलेले कार्यवाहीचा दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनामा केलेला आहे. त्या ठिकाणी दिसुन आलेले नृत्याचे कार्यक्रम व लक्ष्मी कलाकेंद्राचा व्यवस्थापक याने दिलेली माहिती यामुळे माझी खात्री झाली की, आरोपी सुरज बबन मुसळे, (वय-३२ वर्षे) , रा. कान्होपात्रानगर, जामखेड हा दि. १३ जानेवारी रोजीचे २१: १० वाजताचे सुमारास त्याचेकडेस नृत्याचे कार्यक्रम चालविणेकरीताचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना लक्ष्मी नावाचे कलाकेंद्रात विनापरवाना नृत्याचे कार्यक्रम चालविताना मिळून आलेला आहे.
यानुसार फिर्यादी पोलीस हेडकॉन्टेबल संजय भाऊसाहेब लाटे, (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरज बबन मुसळे, वय-३२ वर्षे, रा. कान्होपात्रानगर, जामखेड
याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ (क) (१) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment