जामखेड प्रतिनिधी : ११ जानेवारी
जामखेड जरी तालुका दुष्काळी असला तरी येथील पत्रकार विचाराने सधन आहेत. गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी निर्भिड पत्रकारिता करतात पत्रकार हे प्रसिद्धी साठी नाही तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करत आहेत. असे मत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, दत्तात्रय राऊत, फायकअली सय्यद, अशोक वीर, अविनाश बोधले, संजय वारभोग, किरण रेडे, पप्पूभाई सय्यद, रोहित राजगुरू, अजय अवसरे, संतोष गर्जे, राजू भोगील
मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिपक देवमाने, लियाकत शेख, सुजीत धनवे, सचिन अटकरे तसेच जामखेड पत्रकार संघाचे यासीन शेख, नंदुसिंग परदेशी सह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकशाहीत पत्रकार महत्त्वाचा घटक आहे. पत्रकारांनी बातमी मागची बातमी शोधली पाहिजे. शोध पत्रकारीता महत्त्वाची आहे. तसेच बातमीची सत्यता पडताळणी केली पाहिजे नाहीतर एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही पत्रकारिता हा विषय खुप गहन आहे वाटतो तेवढा सोपा नाही. आमच्या पोलीस टिमने पत्रकारांच्या सहकार्याने चांगले मैदान करून ठेवले आहे येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी काम करणे सोपे जाणार आहे. पत्रकार आणी पोलीस हेल्दी रिलेशन निर्माण केले
वर्दिच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. जामखेड तालुका दुष्काळी असला तरी येथील पत्रकार हे सधन आहेत. असेही गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट म्हणाले की, प्रत्येकाने काळाबरोबर बदलले पाहिजे जो बदलतो तोच स्पर्धेच्या युगात टिकतो जामखेड मधील पत्रकार हे काळाबरोबर बदलणारे आहेत.
यावेळी अविनाश बोधले, अशोक वीर, नंदुसिंग परदेशी, दत्तात्रय राऊत, दिपक देवमाने, फायकअली सय्यद यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण रेडे यांनी केले.
No comments:
Post a Comment