खर्डा प्रतिनधी : ११ जानेवारी
खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने दि. २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रेझींग डे सप्ताह निमित्त खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत विविध कार्यक्रम संपन्न.
यानुसार पोलीस रेझींग डे सप्ताह निमित्त दि. २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामधे दि. २ जानेवारी रोजी खर्डा येथील श्री छत्रपती महाविदयालय येथे खर्डा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस काॅन्स्टेबल अयोध्या पोकळेयांनी महाविदयालयातील मुलींना कायदया विषयी माहीती सांगीतली तसेच सायबर क्राईम बाबत सविस्तर माहीती सांगीतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मुलींनी रस्त्याने जा-ये करताना कोणी टवाळखोर पणआ करत असेल तर त्या बाबत डाईल 112 या नंबर वरती कॉल करुन सदर बाबत ची माहीती सांगावी. तसे नाही करता आले तर महाविदयालयामध्ये खर्डा पोलीस स्टेशन ने तक्रार पेटी बसवलेली आहे. कोणाची काही तक्रार असेल तर ती आम्हाला न सांगता तक्रार पेटी मध्ये टाकावी. तक्रारदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. या कार्यक्रमासाठी सदर कार्यक्रमासाठी 250 ते 300 विद्यार्थीनी हजर होत्या.
दि. ४ जानेवारी रोजी खर्डा जिल्हा परिषद शाळा येथील यांचे विद्यार्थांना पोलीस स्टेशनला निमंत्रित करून त्यांना शस्त्रांबाबत माहीती दिली. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थांना कायदा व गुन्हेगारीबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांना पोलीस स्टेशनला चालणारे कामकाज व वाहतुकीचे नियमांबाबत माहीती दिली. याबरोबरच त्यांच्या काही तक्रारी असतील तर डाईल 112 बाबत माहीती दिली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परीषद शाळेचे एकुण 80 ते 100 मुले हजर होते.
दि. ५ जानेवारी रोजी खर्डा इंग्लीश स्कुल खर्डा येथे कार्यक्रम घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यान विध्यार्थांना खर्डा पोलीस स्टेशन ला असलेल्या सर्व शस्त्रा बाबत माहीती दिली. तसेच मुलांशी संवाद साधुन त्यांचे प्रश्नांची उत्तरे सपोनि पाटील यांनी दिले. वाहतुक नियमांचे पालन कसे करावे व ते नाही केले तर कायदेशीर कारवाई काय आहे या बाबत सविस्तर माहीती सांगीतली. तसेच वाढत्या सायबर गुन्हया बाबत सविस्तर माहीती सांगीतली. तसेच कादयाविषयी माहीती दिली. मुलींना काही अडचण असेल तर त्यांना डायल 112 बाबत माहीती दिली आहे. तसेच खर्डा इंगलीश स्कुल खर्डा येथे तक्रार पेटी बसवलेली आहे. त्या तक्रार पेटीमध्ये तक्रार टाकु शकता व तक्रार दार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ व 700 ते 800 विदयार्थी हजर होते.
याबरोबरच खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 63/2022 भादवि 379 प्रमाणे फिर्यादी काशीबाई सुखदेव राउत वय 70 वर्ष रा नळीवडगाव ता भुम जि उस्मानाबाद यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागीने दि ८ जानेवारी रोजी फिर्यादी काशीबाई सुखदेव राउत यांचे ताब्यात देण्यात आले आहेत.
अश्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. यासाठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्याचेसह पोलीस नाईक संभाजी शेंडे व कॉन्स्टेबल शशिकांत मस्के व पोलीस कर्मचारी उपस्थितीत होते
No comments:
Post a Comment