पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२१ फेब्रुवारी
रयतेचे राजे श्री.छञपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव काल खर्डा येथे साजरा करण्यात आला. खर्डा येथील ३० हजार चौरस फुटावर रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा येथील प्रांगणात साकारलेल्या भव्य अशा छञपती शिवरायांच्या रेखाचिञातून शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमात जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ अशा झांजपथकातून शिवकालीन सांस्कृतिक देखावा सादर केला.हे झांजपथक संपूर्ण खर्डेकर व पंचक्रोशीतील शिवप्रेमी यांचे प्रमुख आकर्षण ठरले.
या कार्यक्रमास आ.रोहित पवार ,सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर,उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर,महालिंग कोरे,वैभव जमकावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील ,प्राचार्य एस.आर.उगले,पर्यवेक्षक पाटील सर, केंद्रप्रमुख केशव गायकवाड,राम निकम,मुकुंद सातपुते,मुख्याध्यापक बाबुराव गिते,सर्व डाॅक्टरर्स ,खर्डा येथील सर्व पञकार व शिवप्रेमी यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
खर्डा येथील शिवपट्टण किल्यावरुन निघालेल्या छञपती शिवरायांची हत्तीवरील भव्य अशी मिरवणूक खर्डा शहरातून काढण्यात आली.या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचा बहुमान तेलंगशी शाळेच्या झांजपथकाला मिळाला.शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री.आनंता गायकवाड सर यांनी या झांजपथकाचे दिग्दर्शन तर विद्यार्थ्यांनी संचलन केले.शाळेतील पाचवी,सहावी व सातवी इयत्तेतील ३५ विद्यार्थ्यांनी ही झांजपथक कला सादर केली.शाळेतील सर्व शिक्षकांनी यात सहकार्य करुन मोलाची भूमिका बजावली.शाळेच्या या उपक्रमाचे आ.रोहित पवार यांनी कौतुक करुन मुख्याध्यापक श्री.केशव गायकवाड,श्री.आनंता गायकवाड व श्री.सुशेन चेंटमपल्ले यांचा यथोचित सन्मान केला.या उपक्रमास अशोक जाधव,नितीन पवार,विजयकुमार रेणुके,संतोष गोरे,लक्ष्मी जायभाय व प्रसाद भिसे यांनी मोलाचे सहकार्य केले.
तेलंगशी शाळेच्या या उपक्रमाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तारअधिकारी सुरेश कुंभार यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment