पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : २० फेब्रुवारी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
शिवरायांच्या प्रतिमेची खर्डा शहरातून हत्तीवरून भव्य दिव्य अशी शाही मिरवणूक काढण्यात आली. पुणे येथील ढोल पथक, लेझीम पथक, टाळकरी, घोडेस्वार, फेटे धारी महिला, झांज पथक, कमांडो पथक व शिवाजी महाराज यांच्या मिरवणूकीवर नागरिकांकडून करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे खरे या शाही मिरवणूकीचे आकर्षण ठरले. तसेच या जयंती सोहळ्याचे आयोजक आ. रोहित पवार यांनीही या शाही मिरवणूकीसाठी आपली उपस्थिती दाखवून
आज दि. २० फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
शिवरायांच्या प्रतिमेची खर्डा शहरातून हत्तीवरून भव्य दिव्य अशी शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात खर्डा किल्ल्यापासून करण्यात आली. शोभायात्रेचे आकर्षण ठरले ते म्हणजे पुणे ढोल पथक, लेझीम पथक, टाळकरी, घोडेस्वार, फेटे धारी महिला, झांज पथक, कमांडो पथक तसेच स्वतः आ. रोहित पवार यांची उपस्थिती. या मिरवणुकीला खर्डेकरांनी मोठे स्वागत केले. यावेळी मिरवणूक मार्गावरील नागरिकांनी आपल्या घरांवरून, इमारतीवरून, दुकानावरून व आहे त्या ठिकाणांवरून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली. पहिल्यांदाच आज खर्डा गावात हत्तीवरून छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक पाहायला मिळाली. यावेळी अगदी लहानापासून ते थोरापर्यंत नागरिक व राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. आ.रोहित पवारांन समवेत कार्यकर्त्यांनी पण "जय भवानी जय शिवाजी "अशा घोषणा संपुर्ण परिसर दणाणून सोडला. या शाही मिरवणूकीसाठी खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, दिपक जावळे , वैभव जमकावळे, खर्डा येथील पत्रकार, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
No comments:
Post a Comment