पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३एप्रिल
महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो . या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास (रोजा ) करतात . आज सांगता म्हणुन ईदगाह मैदानावर सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन रमजान महिन्याच्या सण उत्साहात साजरा करण्यात आला. उपवासानंतर दि. २२रोजी रमजान ईद त्यादिवशी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पढले. या सणामुळे १ महिनाभर चालू असलेल्या उपवासाची (रोजे) सांगता झाली. प्रेम, शांतता व बंधुभाव ही सणाची प्रमुख शिकवण होय. एक महिन्याच्या कडक उपवासाची सांगता म्हणून रमजान ईद दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्याप्रमाणे या दिवशी ईदगाह मैदानावर ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना अफजल कासमी यांनी उपस्थितांना नमाज पाठविला. यावेळी मैदानाच्या बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात
आला. होता. तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही यावेळी भेट दिली. ईदगाह मैदानावर नमज पठण झाल्यावर ईदगाह मैदानावर प्रा मधुकर राळेभात ; शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने ;नगरसेवक अमित चिंतामणी ; बिभिषण धनवडे ; अरुण जाधव ; मोहन पवार , डॉ. भास्कर मोरे ,राहुल उगले , अमित जाधव ; प्रा . लक्ष्मण ढेपे ; आदी हिंदु बांधवांनी मुस्लीम बांधवांना अलिगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या . तर रमजान ईद व अक्षय तृतीय हे सण गेल्या ५१ वर्षानंतर एकत्र आल्याने मुस्लीम बांधवांनी हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या . त्यामुळे ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले . सणाच्या आदल्या दिवशी दि. २१ एप्रिल रोजी कापड दुकानात ग्राहकांची गर्दी झाली रात्री ईदच्या खरेदीसाठी मेनरोड गर्दीने फुलुन गेला होता. यावेळी मैलाना अफजल कासमी व अॅड अरुण जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .
No comments:
Post a Comment