पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ जून
जामखेड येथील मयुर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात दि. २४ जून रोजी सकाळी १०: ४५ वाजताचे सुमारास गि-हाईक म्हणून आलेल्या चार महिलांनी अर्धा ग्रम वजनाचे नाकातील दोन मुरुण्या चोरी प्रकरणी चार महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या बाबत जामखेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड शहरातील जयहिंद चौक या ठिकाणी असलेल्या मयुर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या चार महिलांनी दुकानातील प्रत्येकी अर्धाग्राम वजनाच्या व तीन हजार रूपये किमतीच्या दोन नाकात घालायच्या सोन्याच्या मोरण्या ज्यांची एकुण किंमत ६००० आहे. असा मुद्देमाल चोरून नेला. मात्र हा प्रकार दुकानात कामगार असलेल्या यातील फिर्यादी
ओमकार रामचंद्र काळे यांच्या लक्षात आल्याने सदरची माहीती त्यांनी दुकानाचे मालक संजय मुळे यांना दिली. त्यामुळे संजय मुळे यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फोन केला.
यानंतर काही वेळातच पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल सचिन पिरगळ व पोलीस काॅन्स्टेबल शिंदे असे दुकानात आले. यावेळी फिर्यादी व दुकान मालक संजय मुळे यांनी पोलिसांना सदर घटनेची माहीता दिली. पोलिसांसोबत सदर चार महीलाचा शोध घेतला असता दुकानासमोरच सदर महीला मिळुन आल्या. पोलीसनी सदर माहीलांना चौकशीसाठी ताब्यात घेवून त्याते नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कमल अंबर गुळवे 2)दरका मच्छिन्द्र केंगान 3)बबीता भाऊराव केंगान 4 ) बाई मानीक मोरे रे सर्व रा. लिंबारुई मुरशदपुर, बीड असे सांगितले यावरून फिर्यादी फिर्यादी
ओमकार रामचंद्र काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी सदर गुन्हा कबूल करत चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांकडे सपुर्द केला.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे करत आहेत
या प्रकरणी महिलांना अटक करण्याची कार्यवाही पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ ,देविदास पळसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका धनवडे, सपना शिंदे, पूजा धांडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment