पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २५ जून
'तुला खुप माज आला आहे का? मी हॉटेल मध्ये येऊन फुकट जेवण करुन जातो'. अशी माझी बदनामी करतो का? असे बोलून मारहाण करत मंगेश केदारी याने माझ्यावर पिस्टल रोखली त्यावेळी मी घाबरून तिथुन पळून जायला लागलो तेव्हा मंगेश केदारी माझे मागे पिस्टल घेऊन येऊ लागला मात्र त्याठिकाणी माझे मित्र आल्याने मंगेश केदारी हा त्यांना धक्का मारून तेथुन त्याची दुचाकी गाडी घेऊन पळुन गेल्याने फिर्यादी सागर गवसणे यांचा जीव वाचला. यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश केदारी याचे विरुध्द वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यातील फिर्यादी सागर सुभाष गवसणे (वय ३९) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे आदित्य बिर्ला रोड, कुणाल रेसीडेन्सी येथे गाळा नं ४ व ६ मध्ये मैत्रि मच्छि नावाचे हॉटेल आहे. दि. २१ जून रोजी रात्री ७ : ३० वाजताचे सुमारास माझ्या ओळखीचा इसम मंगेश केदारी व त्याचा अनोळखी जोडीदार माझे हॉटेलवर आला व मला बोलला की, मी हॉटेलमध्ये जेवायला बसु का? त्यावेळी मी त्याला जेवण करण्यास बसा बोललो व मी लघु शंकेसाठी बाजुला असलेल्या ओढयाकडे गेलो असता, मंगेश केदारी व जोडीदार माझ्या मागे आला व मला बोलला की, मला तुमच्याशी बोलायचे आहे त्यावेळी मी त्याला बोललो की हॉटेवर या तिथे बोलू. त्यावेळी तो इसम तेथुन निघुन गेला व मी हॉटेलमध्ये येऊन बसलो. तेथे माझे मित्र सागर बारणे, प्रदिप कोळेकर, गणेश शेट्टी हे जेवण करत होते.
त्यावेळी मंगेश केदारी हा साधारण रात्री 08/00 वा सुमारास पुन्हा माझ्या हॉटेलमध्ये आला व मला बोलला की मला तुझ्याशी बोलायचे आहे बाहेर चल. तेव्हा माझा मित्र सागर बारणे मला बोलला की, बाहेर जाऊन बोलून ये त्यावेळी मी मंगेश केदारी सोबत गेलो तेव्हा तो मला बोलला की, 'तुला खुप माज आला आहे का? मी हॉटेल मध्ये येऊन फुकट जेवण करुन जातो' अशी माझी बदनामी करतो का? असे बोलून त्याने मला हाताने मारहाण करणेस सुरवात केली. त्यावेळी मी खाली पडलो असता अचानकपणे केदारी याने त्याचेकडे असलेली पिस्टल माझेवर रोखली त्यामुळे मी घाबरून तेथुन पळून जायला लागलो. तरीही तो माझ्यामागे पिस्टल घेऊन येऊ लागला. त्यामुळे मी बचाव करण्यासाठी त्याला फरशी फेकून मारली. तेवढ्यात माझा मित्र सागर बारणे व प्रदिप कोळेकर यांनी त्यास पकडले असता हा त्यांना धक्का मारून व दुचाकी गाडी घेऊन पळुन गेला.
तरी मंगेश केदारी रा. 16 नंबर, वाकड, पुणे यांच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे. यानुसार फिर्यादी सागर गवसणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मंगेश केदारी याचे विरुध्द गु.र.नं.द वालम -594/2023 भा.द.वि. कलम 323, 504, 506 (2) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) सह 135, आर्म अॅक्ट 3. 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल लोहार हे करत आहेत.
No comments:
Post a Comment