पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ९ जून
सद्या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात निर्माण होत असलेल्या पार्श्वभूमीवर आपल्या खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये व शांतता अबाधित राहावी यासाठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी आज दि. ९ जून रोजी सायंकाळी ७ :०० वाजताचे सुमारास खर्डा शहरातील मुस्लिम समाजातील मौलाना प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुढील प्रमाणे सुचना देण्यात आल्या. व त्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत देण्यात आलेल्या सुचना
१) जातीय/धार्मिक तणाव होणार नाही असे वादग्रस्त पोस्ट, अथवा गाणे पोस्ट करू नये.
२) एकता टिकून राहील यासाठी प्रयत्न करावेत.
३) व्हाट्सअप, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टाग्रामवर आलेल्या पोस्ट शेयर करू नये.
४) अफवांवर विश्वास ठेवू नये.
५) सोशल मीडिया चा जास्त वापर करू नये.
६) काही माहिती द्यायची असेल तर ती अगोदर पोलीस स्टेशन ला कळवावी.
तरी खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातीय सलोखा व सार्वजनिक शांतता राखण्यासाठी समाजातील सर्व धर्मीय नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे
असेही आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले.
No comments:
Post a Comment