पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ ऑक्टोबर
आज दि .२८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ :१५ मिनिटाने जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री . संत गजानन महाविद्यालय येथे चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी परिसरातील अंतराळ प्रेमी ,विद्यार्थी ,पालक व पंचक्रोशीतील नागरिकांना खर्डा येथील श्री. संत गजानन महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने आज होणाऱ्या चंद्रग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी अत्याधुनिक दुर्बीण उपलब्ध करून देण्यात येणार आहे .चंद्रग्रहणाच्या वेळी याचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घेण्याचे आव्हान संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजयसिंह अण्णा गोलेकर, प्रा. डॉ. ओंकार खिस्ते यांनी केले आहे.
चौकट
आज २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण भारतासहीत आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया खंडातील नागरिकांना दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक तथा स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा