पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२८ फेब्रुवारी
जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्य विश्वात अतुलनीय असे योगदान आहे. मराठी भाषा सर्वांगाने समृद्ध करणाऱ्या थोर साहित्यिकांमध्ये त्यांचे अग्रगण्य असे स्थान आहे. आज त्यांच्या जन्मदिन आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्यात येतो. तसेच कुसुमाग्रज्य यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून हे युग स्पर्धेचे असेल तरी मातृभाषेचे संवर्धन ही काळाची गरज आहे मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे व मातृभाषा संवादाचे सशक्त माध्यम आहे त्यात प्रभावीपणे अभिव्यक्त होता येतं असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन आवारे यांनी केले
श्री. छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री. संत गजानन महाविद्यालय दरवर्षीप्रमाणे शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा 'मराठी राजभाषा दिन' मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिवस यांचे औचित्य श्री छत्रपती विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व विद्यालयातील विद्यार्थिनींनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे काव्यवाचन घेण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन केले तर ढाळे नम्रता व कमलेश वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.प्रा.डॉ.चंद्रसेन आवारे, डॉ.शिवानंद जाधव , ओंकार खिस्ते ,राजू म्हेत्रे शिक्षिक कर्मचारी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीकांत तनपुरे यांनी केले तर आभार व्यक्त डॉ . शिवानंद जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ .महेश गोलेकर यांनी मराठी विभागाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment