पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३ फेब्रुवारी
भाजपा नेते आ. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी खर्डा जिल्हा परिषद गटातील आ. राम शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे युवा कार्यकर्ते बाजीराव गोपाळघरे यांची निवड केली आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा गट हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. बऱ्याच वेळा या भागातील कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारिणीत चांगले स्थान असते. त्याच पार्श्वभूमीवर खर्डा ग्रापंचायत हद्दीतील नागोबाची वाडी येथील तरूण कार्यकर्ते बाजीराव गोपाळघरे यांची युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाजीराव गोपळघरे यांनी आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून खर्डा व परिसरातील अनेक कामांचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावली आहेत. पक्षसंघटन वाढविण्यासाठीही ते नेहमीच तत्पर असतात. तसेच पक्षाच्या वतीने आयोजित का व उपक्रम यात ते सातत्याने सहभागी असतात. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याने खर्डा भागात त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला आहे. तसेच दि. १ जानेवारी रोजी माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा व परिसरात राबवलेल्या विविध कार्यक्रमांसाठी नागरिकांची मोठी उपस्थिती यावरूनच त्यांचा जनसंपर्क किती मोठा आहे हे दिसून येते. पक्षाने केलेली निवड ही योग्यच असल्याच्या भावना खर्डा व परिसरातून व्यक्त होत आहेत. याबरोबरच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्याचे उत्स्फूर्त अभिनंदन केले जात आहे.
चौकट
जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकारणी
जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र कार्यतत्पर आमदार प्रा. राम शिंदे साहेब यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष अजय काशिद यांनी जाहीर केलेली माझी निवड सार्थ ठरवण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी नेतृत्वाने दिलेली जबाबदारी युवा मोर्चाच्या माध्यमातून सक्षमपणे पार पाडणार असून केलेल्या कामाची पावती आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसून येईल
बाजीराव गोपाळघरे
नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष
No comments:
Post a Comment