पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-४ फेब्रुवारी
जामखेड शहरातील मिलींदनगर भागात एका जणांच्या वाढदिवसानिमित्त विना परवानगी मोठ्या आवाजात डिजे साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्या डिजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून डिजेचे वाहन, साऊंड सिस्टीमसह ५ लाख २५ हजारांच्या मुद्देमालासह आरोपीस अटक करण्याची कारवाई जामखेड पोलीसांकडून करण्यात आली आहे. तसेच यापुढेही अशीच सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला असून यामुळे डिजे चालकांनामध्ये खळबळ तर नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, यातील फिर्यादी जामखेड
पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवनाथ मांडगे (वय-३५) यांनी दिलेल्या माहितीनुसार ते काल दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री २२ : १० वाजताचे सुमारास ते व त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्टेबल पी. ए. इंगळे, कॉन्स्टेबल डी. एस. पळसे, के. पी. घोळवे, प्रकाश जाधव असे पोलीस स्टेशनला असताना पोलीस हेडकॉन्टेबल पी. ए. इंगळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जामखेड शहरातील मिलींद नगर येथे भुतवडा रोडवर एका वाहनावर डिजे लावून मोठया आवाजात गाणे लावलेले आहे. त्यानुसार आमचे पोलीस पथक रात्री १०: ४५ वाजताचे सुमारास पंचासह सदर ठिकाणी गेलो असता तेथे वहान क्र. MH. १२ QA ७६३५ या वहानावर सांऊड लावुन मोठ्या आवाजात गाणे चालु होते. तेव्हा सदर बहानातील इसमास गाणे बंद करणेची सुचना दिली असता त्याने गाणे बंद केले नाही. तेव्हा आम्ही पोलीसांनी सदर बहानात जावुन चालु असलेले गाण्याचे मशीन बंद केले व मशिन चालवणाऱ्या व्यक्तीस नाव विचारले असता त्यान अविनाश विठ्ठल शिंदे (वय-२५) धंदा साऊंड सिस्टीम ऑपरेटर रा. साकत ता. जामखेड असे नाव असल्याचे सांगीतले. याबरोबरच अधिक विचारणा केली असता विकास दामु तांदळे रा. मिलींद नगर याचा वाढदिवस असल्याने मी गाणे वाजवत असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यास गाणे वाजवण्याचा परवाना आहे काय? असे विचारले असता, परवाना नसल्याचे त्याने सांगीतले. यावरून साऊंड सिस्टीम ऑपरेटर अविनाश विठ्ठल शिंदे (वय-२५) धंदा- रा. साकत ता. जामखेड हा त्याचे ताब्यातील वहान क्र. एम एच १२ क्यु ए ७६३५ वरील साऊंड सिस्टीम सार्वजनिक ठिकाणी विना परवाना मोठ्या आवाजात गाणे वाजवताना मिळून आला म्हणून फिर्यादी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवनाथ मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश विठ्ठल शिंदे याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (आर), १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जप्त करण्यात आलेले वाहानाचे व वाहानातील साऊंड सिस्टीमचे वर्णन खालील प्रमाणे.
१) ४,००,०००/- रु किं.चा टाटा कंपनीचा ७०६, मडिलचा सहा चाकी वहान क्र. एम एच १२ क्यु ए ७६३५.
२) १,००,०००/- रु किं.चे ६ लहान मोठे साऊंड, ३) २५,०००/- रु किं.ची मशिन (मिक्सर) असा एकूण
५,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल पोलीस हेडकॉन्टेबल पी. ए. इंगळे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment