पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-११ मार्च
जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारातील रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व अर्थिक पिळवणूक होत आहे , याविरुद्ध काॅलेजचे शेकडो विद्यार्थीनी व विद्यार्थी गेली सात दिवसांपासून अंदोलन करत आहेत. तसेच डॉ. मोरेंच्या विरूद्ध विनयभंग व वन्य प्राणी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरिही प्रशासन त्याला अटक करत नाही. यामुळे काॅलेजच्या गैरकारभराची चौकशी करावी, भास्कर मोरेला अटक करावी व अंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत खर्डा येथील विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी व युवकांनी जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देत सदर अंदोलनास पाठींबा दिला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनावर राहुल शिकतोडे, रुद्र हुंबे, बालाजी मदने, रोहन सुरवसे, पारस सुरवसे, पारस सकट, मयूर, सुरवसे, विशाल निकम, अजय सुरवसे,अक्षय सुरवसे, विठ्ठल वारे, आकाश खेडकर, तेजस चावणे, नितीन कणसे, दीपक कनेरकर, स्वप्निल शिंदे, संकेत शिंदे, अंगद भाकरे, बाबू जोरे, सागर सोनवणे, गणेश भुते, सागर गटकळ, गणेश नेहरकर, गणेश ढगे, अजय सकट, सुजित पवार, प्रतीक जावळे, अवि सकट, ईश्वर निकम, संभाजी गोलेकर, करण बोडके, शिवकुमार काशीद, विनोद गटकळ, संभाजी भोसले, ओंकार इंगळे, ऍड. महेश धांडे, नानासाहेब गोपाळघरे, अनिल दराडे, बाळासाहेब गोपाळघरे,सोपान गोपाळघरे उपस्थित होते.
या अंदोलनात शिवप्रतिष्ठानचे जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले व व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत हे प्रत्यक्ष सहभागी झाले असून. इतर अनेक पक्षसंघटनांनी या अंदोलनास पाठींबा दिला आहे.
No comments:
Post a Comment