पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२ मार्च
जामखेड नगरपरिषदेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी महायुती सरकारने 77.53 कोटी रूपयांचा भरीव निधी मंजुर केला आहे. सदर कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता राज्य सरकारकडून नगरोत्थान अभियान राबविण्यात येते. याच अभियानातून जामखेड शहराचा मलनि:स्सारण प्रकल्प व्हावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी सुधारित तांत्रिक मान्यता दिली होती. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत गठित प्रकल्प मान्यता आणि संनियत्रण समितीच्या 2 फेब्रुवारी 2024 च्या बैठकीत सदर प्रकल्प मंजुरी देण्यात आली होती.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नगरोत्थान अभियानातून जामखेड नगरपरिषदेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देत तब्बल 77.53 कोटींचा भरघोस निधी मंजुर केला आहे. हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे सरकार दरबारी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते.अखेर हा महत्वपूर्ण प्रकल्प मंजुर करून आणण्यात आमदार प्रा राम शिंदे हे यशस्वी ठरले आहेत. विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात करोडोंचा निधी खेचून आणला आहे. महायुती सरकारमध्ये असलेले राजकीय वजन वापरून आमदार शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात विकास कामांसाठी निधी आणण्याचा धडाका लावला आहे.आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून मतदारसंघात विकासाची गंगा अवतरली आहे. यातून अनेक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागले आहेत.
मराठवाड्याच्या सरहद्दीवरील महत्वाचे शहर म्हणून जामखेडला ओळखले जाते. येथील बाजारपेठे मोठी आहे.नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे नेहमी प्रयत्नशील असतात. शहरातील सांडपाण्याची व्यवस्था कालबाह्य झाली होती. ही व्यवस्था दर्जेदार असावी, यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड नगरपरिषदेचा मलनि:स्सारण प्रकल्प शासन दरबारी सादर केला होता.
हा प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 77.53 कोटी रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय 7 मार्च रोजी जारी करण्यात आला आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यामुळे जामखेडकर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राखले जाण्यास मदत होणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड शहरासाठी मलनिस्सारण प्रकल्प मंजुर करून आणल्याबद्दल शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
चौकट
जामखेड शहर झपाट्याने विकसीत होत आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझा नेहमी प्रयत्न सुरु असतो. शहर स्वच्छ सुंदर असावं, गटारमुक्त, डासमुक्त असावं, यासाठी जामखेड शहर मल:निस्सारण प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा हाती घेतला होता. महायुती सरकारने जामखेड शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जामखेड नगरपरिषद मलनि:स्सारण प्रकल्पास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 77.53 कोटींचा भरीव निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !
*- आमदार प्रा राम शिंदे*
No comments:
Post a Comment