पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२ एप्रिल
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते, त्याचबरोबर खर्डा येथे जयंती उत्सव साजरा करीत असताना मिरवणुकीत कोणीही दारू पिऊन धिंगाणा घालू नये अशा समाजकंटकावर पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे. पोलीस प्रशासनाकडून जयंती उत्सवात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पाडावी असे आवाहन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी शांतता मीटिंगमध्ये केले.
काल दि ११ एप्रिल रोजी सायंकाळ ५.३० वाजता खर्डा येथील आंबेडकर भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी सर्वांनी शांत वातावरणात जयंती साजरी करावी असे आवाहान त्यांनी सर्व भीमसैनिकांना व खर्डा व पंचक्रोशीतील नागरिकांना केले.
यावेळी सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचा सत्कार समस्त भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी उपस्थित सपोनि विजय झंजाड,प्रशांत कांबळे,पत्रकार आशुतोष गायकवाड, दत्तराज पवार, जितू पगारे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे, शेषराव मस्के, गणेश बडे, गोविंद दराडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे, भीमाराव घोडेराव,निखिल पगारे,अक्षय जावळे, प्रकाश जावळे, दादा गायकवाड, कुंडलिक जावळे,अविनाश समुद्र यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment