पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१० एप्रिल
जामखेड शहरातील नागेश विद्यालयाने साकारलेल्या मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची वर्ल्ड रेकॉर्ड सलग्न अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये साकार झाले आहे. यामध्ये 2500 विद्यार्थी व 17 महाराष्ट्र बटालियनची एनसीसी कॅडेट सहभागी झाले त्याचे मोजमाप लांबी 240 रुंदी 225 फूट आहे. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालय परिसरात साकारले कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी ते साकारले.
अशिया बुक ऑफ रेकॉर्डने 19 मार्च 2024 रोजी निश्चित केले आहे.अशी नोंद झाली वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी सलग्न अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.या कार्यक्रमाचे आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे सन्मानपत्र मेडल गिफ्ट बॉस चे वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 12 -4- 2024 रोजी सकाळी 8 वाजता नागेश विद्यालय येथे समारंभ पूर्वक होणार आहे.
No comments:
Post a Comment