पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७जुलै
शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे कर्जत व जामखेड जिल्हा अहमदनगर या दोन्ही तालुक्यांसाठी पिक कापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई म्हणून १६८.३६ कोटी इतकी रक्कम मंजूर झालेली आहे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्या नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान पिक विमा या योजनेच्या धर्तीवर एक रुपया मध्ये पिकविमा हि योजना २०२३ मध्ये सुरु केली आहे कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये खरीप २०२३ हंगामा मध्ये झालेल्या पिक विमा नुकसान भरपाई पोटी दोन्ही तालुक्यासाठी १६८.४४कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झाली आहे . हि रक्कम पिक कापणी प्रयोगा नंतरची आहे . कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्या मध्ये या योजने अंतर्गत पिक नुकसान भरपाई अग्रीम रक्कम म्हणून ₹ १०.४२कोटी रुपये व शेतकर्यांनी नुकसानीचे दावे केल्यानंतर ₹२.६६कोटी रुपये एवढी रक्कम यापूर्वीच संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे . पिक कापणी प्रयोगानंतरची मंजूर झालेली पिक विमा नुकसान भरपाई रककम राज्य सरकार आणि विमा कंपनी शेतकर्यांच्या खात्यावर टप्या टप्याने वितरीत करणार आहे
एक रुपया मध्ये पिकविमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच आणि एकमेव राज्य आहे . कोणत्याही संकटाचा शेतकऱ्यांना सामना करता यावा म्हणून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे
प्रतिक्रिया :
एक रुपया मध्ये पिक विमा योजना आणून कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर पणे उभे आहे असे शेतकऱ्यांना अश्वासित केले आहे . . याअगोदर ही कर्जत तालुक्या मध्ये शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पिकविमा नुकसान भरपाई २५% अग्रीम रक्कम देण्यात आलेली होती तसेच शेतकऱ्यांनी पिक नुकसान झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यामध्ये ही त्या संबंधित शेतकर्यांना पिकविमा नुकसान भरपाई जमा झालेली आहे . महायुती सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे शेतकर्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे . पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा होण्याची प्रकिया प्रगती पथावर आहे . महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे पिक विमा नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे हे सर्वसामान्य शेतकर्यांना माहीत आहे त्यामुळे विरोधकांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये . असा घणाघाती टोलाही आ प्रा .श्री राम शिंदे यांनी कर्जत जामखेडच्या लोक प्रतिनिधीचे नाव न घेता लगावला
आ.प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment