पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१८ जुलै
जामखेड येथून कांदे विकून घरी नान्नजकडे येणाऱ्या शेतकऱ्याला मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लुटून शेतकऱ्याकडील १ लाख ६० हजार रुपयांची रोकड लुटली होती.
परंतू पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी ४८ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
पारस छगन भोसले व दीपक पवार, रा. आरोळे वस्ती, जामखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय साठे, पोलिस हेडकॉन्स्टेबल इंगळे, पो. नाईक संतोष कोपनर, पो. नाईक जितेंद्र सरोदे, पो. अंमलदार देवा पळसे, यांनी ही करवाई केली.
गुन्हा घडल्यापासून पारस छगन भोसले व दीपक पवार, हे दोन्ही आरोपी दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. पो. नि. महेश पाटील यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध घेतला.
हे आरोपी जामखेड शिवारातील आयटीआयजवळील काळेवाडी तलाव परिसरातील म्हसोबा मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती मिळताच पोहेकॉ. इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे ,पोना. संतोष कोपनर, पोना. जितेंद्र सरोदे, पो. अंमलदार देवा पळसे, यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आरोपींचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले.
सदर आरोपींना पोलीस स्टेशनला आणून सखोल विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून अजून या गुन्ह्यात कोण कोण आरोपी आहेत विचारले असता गणेश विटकर व हरी माने ( पूर्ण नाव माहीत नाही)मुंजोबा गल्ली जामखेड यांचा सहभाग असल्याचे सांगितले त्यानुसार अटक केलेला आरोपींना दिलेल्या माहितीनुसार फरार असलेल्या गणेश विटकर हरी माने या दोन आरोपींचा शोध घेत असताना आज दिनांक १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जामखेड ते खर्डा जाणाऱ्या रोडवर गणेश विटकर व हरी माने राहणार मुंजोबा गल्ली जामखेड यांना अटक करून गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , कर्जत विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, जितेंद्र सरोदे, संतोष कोपनर, प्रकाश मांडगे ,अविनाश ढेरे, देविदास पळसे, कुलदीप घोळवे यांनी केली आहे
No comments:
Post a Comment