जामखेड प्रतिनधी/१०मे२०२५
भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धतणावाच्या पार्श्वभूमीवर, जामखेड पोलीस आणि प्रशासन यांनी सर्व नागरिकांना सुरक्षा, सावधगिरी आणि जागरुकतेबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य; मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परीक्षेत्र; मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर; तसेच मा. पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला यांच्या निर्देशांनुसार हे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
मार्गदर्शनातील महत्वपूर्ण बाबी आणि निर्देश;
अफवांना नकार – सरकारी माहितीवर विश्वास
पोलीसांनी नागरिकांना स्पष्ट सूचना दिली आहे की, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. *केवळ* आकाशवाणी, दूरदर्शन, सरकारी वेबसाइट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा. अशा भ्रमात्मक किंवा खोट्या बातम्या पसरवणे गुन्हा आहे याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
सोशल मीडिया आणि सायबर सुरक्षा
सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप किंवा अज्ञात स्रोतांवर येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये. अनोळखी APK फाईल्स, लिंक्स उघडू नयेत. यामागे सायबर अटॅक किंवा गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न असू शकतो. अहिल्यानगर पोलीसांनी सायबर सेल ही सामाजिक माध्यमांवर निरंतर देखरेख ठेवत आहे.
संशयास्पद वस्तू व व्यक्ती
संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलीस किंवा प्रशासनाला कळवावे. Dial 112 वर पोलिसांना सूचित करणे आवश्यक आहे.
धार्मिक-जातीय संवेदनशीलता
कोणत्याही धार्मिक, जातीय भावना दुखावणाऱ्या टिप्पण्या करणे टाळावे. सर्व नागरिकांनी एकजुटतेने वागावे.
ब्लॅकआऊटची तयारी
ब्लॅकआऊट (वीजपुरवठा बंद) होण्याच्या संभाव्यतेसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी, नागरिकांपर्यंत व्हिडिओ, मार्गदर्शक साहित्य पोहोचवले आहे. सर्वांनी या माहितीचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
समाजाची जागरुकता
सर्व सोसायटी, सदस्यांनी बैठक घेऊन ब्लॅकआऊटबाबतच्या माहितीची पुनरावृत्ती करावी. गटचर्चेतून सर्वांना जागरुक करावे.
सैन्य गतिविधीचे चित्रीकरण वापरणे बंद
सैन्याच्या तयारी किंवा गतिविधींचे चित्रीकरण करणे, तसेच ती सोशल मीडियावर प्रसारित करणे, हे गुन्हा आहे. ही माहिती शत्रूला मिळू नये याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
कोट-
सर्व नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सुरक्षा प्रयत्नांना सहकार्य करावे., सर्वांनी शांतता, विवेक आणि एकजुटता राखून, देशाच्या सुरक्षेसाठी सहभागी व्हावे. असे आवहान जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
(महेश पाटील, पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस ठाणे, अहिल्यानगर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा