शिर्डी प्रतिनधी/९मे२०२५
शिर्डी येथील प्रख्यात साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक भेट देत असतात. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिर्डीच्या मंदिराची सुरक्षा अधिक चोख करण्यात आली असून मंदिर परिसरात सख्त जागरूकता असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आहिल्यानगरमधील शिर्डीच्या साईबाबा देवस्थानातही सुरक्षिततेची व्यवस्था घाटत असून मंदिरात वाहिली जाणारी फुलं, हार आणि इतर पूजासामग्री स्कॅनिंग केली जात आहे. या स्कॅनिंगच्या माध्यमातून कोणताही संशयास्पद पदार्थ मंदिरात शिरू नये याची काळजी घेतली जात आहे.
शिर्डी मंदिराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना मंदिरात मोबाईल फोन, पॉवर बँक, लॅपटॉप यासारखी उपकरणे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ कारवाई केली जात आहे.
नाशिकमधील मॉकड्रील:
नाशिकमधील पंचवटी येथील रामकुंड, कपालेश्वर मंदिर तसेच काळाराम मंदिराच्या परिसरात मॉकड्रील करण्यात आले. आपत्तीजन्य परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. पोलीस, अग्निशमन विभाग, नागरी संरक्षण दलाचे जवान आणि आरोग्य विभाग यांनी या मॉकड्रीलमध्ये भाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा