जामखेड प्रतिनधी/१ऑक्टोबर२०२५
जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथे दसरा व नवरात्र या सणांच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांसाठी खास सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामजिक कार्यकर्ते पैलवान सागर (भाऊ) टकले व सामाजिक कार्यकर्ते संतोष (भाऊ) गव्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सांस्कृतिक कार्यक्रम उध्या दि.२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले लोकप्रिय गायक सोनू (भाऊ) साठे आपल्या सुरेल गाण्यांनी रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या निमित्ताने गावात दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यंदा विशेष आकर्षण म्हणून गायक सोनू भाऊ साठे यांचा भव्य गाण्याचा कार्यक्रम ठरणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांच्या गायन कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळे बटेवाडीतील रसिकांसाठी ही एक खास संधी ठरणार आहे.या कार्यक्रमासाठी स्थानिक तरुण मंडळी, ग्रामस्थ, तसेच पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित असून आयोजकांनी सर्व मित्रपरिवार, आप्तेष्ट व ग्रामस्थांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन पै.सागर टाकले व संतोष गव्हाळे यांनी केले आहे. संगीताचा हा अद्वितीय सोहळा गावातील नवरात्र उत्सवाला अधिक रंगतदार व संस्मरणीय बनवणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा