सध्या शासनाच्या आदेशानुसार महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती व पिकांचे पंचनामे करत आहेत.जामखेड तालुक्यातील धनेगाव परीसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास सर्पदंश झाल्याने त्यास धनेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती समजताच विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी देखील हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली.मागील 15 दिवसांपासून जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना महसुल विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी करुन महसुल विभागाचे ग्रामसेवक व तलाठी हे पंचनामे करण्याचे काम करीत आहेत.
दि.2 आक्टोबर रोजी अनुषंगाने दसरा सण असून देखील धनेगाव परीसरात तलाठी आकाश काशिकेदार हे नुकसान झालेल्या शेताची पंचनामे करण्यासाठी गेले होते. सकाळी 8 वाजल्यापासून पंचनामे करीत होते. पंचनामे करत असतांना सकाळी 11 वाजताच्या सुमारास तलाठी केदार हे नदिच्या कडेने शेतकरी सुहास काळे, संदिप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे चालले होते.याच दरम्यान गवतात असलेल्या सापावर तलाठी यांचा पाय पडल्याने त्यांना सापाने दंश केला व त्यांना लगेचच चक्कर येण्यास सुरवात झाली.ही घटना त्यांच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली.सदर शेतकऱ्यांनी तलाठी यांना तातडीने शेतातुन उचलुन आणत धीर देत जवळील वस्तीवर आणले व तातडीने चारचाकी वाहनाने जामखेड येथील खाजगी शिलादीप हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.यावेळी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यात शेतकरी सुहास काळे,संदिप काळे, वैभव काळे,अनिल काळे, पवन काळे व मनोज काळे, सोनेगाव चे सरपंच विशाल वायकर यांनी मदत केली.घटनेची माहिती मिळताच खाजगी हॉस्पिटलला सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन तलाठी आकाश काशिकेदार यांच्या तब्यतेची विचारपूस केली.सध्या तलाठी केदार यांची प्रकृती स्थिर आहे.तसेच तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी देखील हॉस्पिटल मध्ये जाऊन तलाठी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा